हे इतक्यावरच थांबले नाही तर पुढे काही दिवसांनी पुन्हा एक मेसेज आला. त्यात ‘मै अल्फिया शेख, ३० लाख रुपये नहीं दिये तो रेप के केस मे अंदर कर दुंगी’, अशा पद्धतीचा मेसेज पाठवला. काही दिवसानंतर पुन्हा रुपेशला ‘दे रहा है क्या पैसा, नही तो मार दूंगा. तेरी पुरी सेटिंग हुई है, बहुत जल्द तेरे को गोली मार के जायेंगे, तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’ असा धमकीचा मेसेज करून ३० लाख रुपयांची मागणी मेसेजद्वारे केला आहे.
हा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्र फिरवली आणि मुंबईतून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियातून पोलिसांचे आभार मानले आहेत. ”सदरक्षणाय खलनिग्रहणाय्…कानून के हाथ बहुत लंबे होते है! धन्यवाद…भारती विद्यापीठ पोलीस,’ अशी फेसबुक पोस्ट मोरे यांनी लिहिली आहे.
याआधी देखील रुपेशला आलेली आहे धमकी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरे यांनी मागील वर्षी जून महिन्यात कात्रज भागात एका मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या मेळाव्याची बरीच जबाबदारी रुपेश यांच्या खांद्यावर होती. या मेळाव्यादरम्यान रुपेश यांनी त्यांची कार थोरवे शाळेच्या वाहनतळात उभी केली होती. तेव्हा एकाने त्यांच्या गाडीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. रुपेश हे परत गाडीवर आल्यावर त्यांना त्यांच्या गाडीवर एक कागद दिसला. त्यांनी तो वाचला असता त्यात, ‘सावध रहा रुपेश, अन्यथा…’ असा धमकीवजा मजकूर लिहिलेला आढळला होता. याप्रकरणी देखील वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली होती.