नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे (SP) माजी नेते आणि अमर सिंह () यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठलं होतं. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

राजकीय कारकीर्द

उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं आजपर्यंत वजन होतं. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. आजारी पडण्यापूर्वी ते भाजपच्या अतिशय जवळही आले होते.

मार्च महिन्यातच पसरली होती निधनाची अफवा

उल्लेखनीय म्हणजे, मार्च महिन्यात परदेशात उपचार सुरू असतानाच त्यांच्या निधनाची अफवा मीडियात पसरली होती. त्यावर त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असा व्हिडिओ मॅसेज सोशल मीडियावरून आपल्या हितचिंतकांना दिला होता. सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. ‘आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशी बाकी आहे आणि होशही बाकी आहे. माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवलीय. यमराजने मला बोलावल्याची. असं काही झालेलं नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत’, असं अमर सिंह यांनी या व्हिडिओत म्हटलं होतं.

अमिताभ बच्चन यांची मागितली होती माफी

तर त्याअगोदर आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांची माफी मागितल्यानंही अमर सिंह चर्चेत आले होते. ‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचं भलं करो’ असं ट्विट अमर सिंह यांनी केलं होतं.

अधिक वाचा : अधिक वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here