सोलापूर: इयत्ता बारावीमध्ये शिकणारी १७ वर्षांची मुलगी. ट्युशन संपवून घरी जात असताना मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एकाने अडवून तिच्यावर बलात्कार केला. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल होऊन चोवीस तास उलटल्यानंतर पुन्हा त्याच दोन आरोपींनी पिडितेच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिडीत तरूणीची दोन बोटे तुटली आहेत.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात पीडितेची दुसरी फिर्यादही दाखल झाली आहे. पहिली फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे मोकाट फिरणाऱ्या संशयित आरोपींनी दुसरा गुन्हा केला. अक्षय विनायक माने (वय २३) आणि नामदेव सिध्देश्वर दळवी (वय २४, दोघेही रा. बळेवाडी, ता. बार्शी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ट्युशनसाठी आलेल्या विद्यार्थीनीवर अत्याचार

पिडीत मुलगी रविवारी बार्शी शहरात ट्युशनसाठी आली होती. ट्युशन संपवून स्कुटीवरून परत गावाकडे जात असताना अक्षय माने आणि नामदेव दळवी या दोघांनी तिचा मोटारसायकलवरून पाठलाग सुरू केला. रेल्वे रूळ ओलांडून कासारवाडीजवळ आल्यानंतर पिडितेच्या स्कुटीला मोटारसायकल आडवी लावून तिला थांबवले. त्यानंतर दोघांपैकी एकाने तिला ओढत नेऊन बाजूच्याच शेतामध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले. पिडितेने घरी जाऊन हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर पिडीता व नातेवाईकांनी बार्शी शहर पोलीस ठाणे गाठून संशयित आरोपींविरुध्द फिर्याद दिली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६, ३५४,३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार दोन्ही आरोपींविरूध्द दि. ५ मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल केला. तपास महिला फौजदार सारिका गटकूळ करीत आहेत.

डोंबिवलीतील ‘त्या’ इमारतीला अखेरचा निरोप; घरातून सामान बाहेर काढताना रहिवाशी गहिवरले
पोलीस तक्रार का दिली म्हणून पीडितेवर हल्ला

बलात्काराची दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मार्च रोजी रात्री त्याच संशयित आरोपींनी पिडीत मुलीवर तिच्या घरात घुसून कोयता आणि सत्तूरने वार केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे ७ मार्च रोजी बार्शी शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस तक्रार का केली? या कारणाने संशयित आरोपीनी पीडित तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरूणीची दोन बोटे देखील तुटली आहेत. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पीडित तरूणीला उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला, काढणीला आलेली पिके आडवी, जगाचा पोशिंदा दुहेरी संकटात
आई वडील हे दोघे पोलीस स्टेशनला गेले असता, मोकाट फिरणाऱ्या आरोपींनी हल्ला केला

बार्शी शहर पोलिसांनी बोलावल्यामुळे पिडितेचे आईवडील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पिडीत मुलगी घरी एकटीच होती. तीच संधी साधून अक्षय माने व नामदेव दळवी यांनी तिचे घर गाठले. तिच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार केले. त्यात तिच्या हाताची दोन बोटे तुटली असू ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी त्याच दोन्ही आरोपींविरुध्द बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०७, ३२४, ३२६, ४५२, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पुढील तपास करीत.

women’s day : दोन मेट्रो स्थानके महिलांहाती, ३ शिफ्टमध्ये करतात काम; स्त्रीच्या शक्तीला सलाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here