father killed newborn child, अत्याचारानंतर मुलगी गर्भवती, वडिलांनी घरीच प्रसूती करून जन्मजात बालकाचे शिर धडावेगळे केलं – father killed newborn child after helping his daughter to deliver a baby in satara
सातारा: अत्याचारानंतर साडेआठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून वडिलांनी बाळाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शिर धडा वेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मजात बाळाला मारून टाकल्यानंतर त्याला नाल्यामध्ये टाकून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती संबंधित पीडित मुलीने दिली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या जबाबावरून ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन अटक केली, तर मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
ढेबेवाडी विभागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित युवकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत, लैंगिक अत्याचार व अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन अटक केली आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. संबंधित युवक व मुलीच्या वडिलांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. IND vs AUS: चौथी कसोटी ४८ तासांवर; मैदानावर पोहोचताच ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्काच बसला पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्यातून ती ८ महिने २१ दिवसांची गर्भवती राहिली होती. याप्रकरणी गुन्ह्यात आरोपीला अटक करून पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याबाबत मुलीकडे विचारणा केली असता वडिलांनी घरीच प्रसूती केल्याचे मुलीने सांगितले. तसेच जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून वडिलांनी बाळाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शिर धडावेगळे केले. तसेच ते नाल्यामध्ये टाकून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली.