मुंबईः मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ९ ते ११ मार्चदरम्यान मुंबई शहर व उपनगरात दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ११ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत पाणीकपात असणार आहे. त्याममुळं दोन दिवस मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
ठाण्यातील कोपरी पुलाजवळच महापालिकेकडून नवीन पुलाचे काम सुरु असून या कामामुळं मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई २ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती झाली होती. त्यामुळं या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी ९ मार्च रोजी सकाळी १०पासून हाती घेतले जाणार आहे. शनिवारी ११ मार्चरोजी सकाळी १० पर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळं ९ मार्च ते ११ मार्चपर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. अत्याचाराची तक्रार दाखल करणेच जीवावर बेतलं, नराधमांनी १२वीतील मुलीसोबत केलं क्रूर कृत्य या विभागात पाणीकपात
मुलूंड (पूर्व) व पश्चिम विभाग, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील पूर्व व पश्चिम विभाग, कुर्ला विभाग, देवनार, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, या विभागात पाणीकपात होणार आहे.