संपूर्ण मेट्रो लाइन २ चं दोन भागात विभाजन करण्यात आलं आहे. 2A आणि 2B हा मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर आणि अंधेरी पश्चिम – डीएन नगर ते मंडाले डेपो असा आहे.
मेट्रो लाइन 2B ची लांबी २४ किलोमीटर असून या मार्गावर २० स्टेशन्स असणार आहेत. ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला (पू), ईईएच चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो अशी स्थानकं या मार्गावर असणार आहेत.
मंडाले ते डायमंड गार्डन
त्याशिवाय मंडाले ते डायमंड गार्डन मार्ग हादेखील मार्ग असणार आहे. या मार्गावर ५ स्टेशन्स असतील. डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द, मंडाले अशी स्थानकं असतील. मंडाले ते डायमंड गार्डन मार्ग हा ५ किलोमीटर लांबीचा मार्ग असेल.
मेट्रो २ बीचा डेपो मंडाले इथे असेल. कोणत्याही मेट्रो मार्गावर ट्रेन सुरळित सुरू राहण्यासाठी इथे एक ऑपरेटिंग डेपो असणं आवश्यक आहे.
कुठे असणार इंटरचेंजेस?
ESIC नगर इथे मेट्रो लाइन ७, आयकर कार्यालय आणि बीकेसी स्थानकांवर मेट्रो लाइन ३, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशनवर मेट्रो लाइन ४ असे इंटरचेंजेस असणार आहेत.
आतापर्यंत मेट्रोल 2B चं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. या संपूर्ण मार्गासाठी जवळपास १०,९८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी अर्थात MMRDA नुसार पुढील २०२४ या वर्षात हा मार्ग सुरू केला जाईल अशी शक्यता आहे.