देहरादूनः होळी हा लहान मुलांसह मोठ्यांचाही आवडीचा सण आहे. भारताच्या विविध भागात होळी वेगवेगळ्या ढंगात साजरी केली जाते. मात्र, भारतात काही अशी गावं आहेत जिथे होळी खेळणं अशुभ मानलं जातं. इथे रंगाने होळी खेळली जात नाही. पिथौरागढ जिल्ह्यात आजही होळीच्या रंगांना अशुभ मानलं जातं. होळी खेळल्याने देवाचा कोप होईल, अशी मान्यता गावकऱ्यांमध्ये आहे.

उत्तराखंडमध्ये पिथौरागढ जिल्ह्यातील धारचूला आणि मुसियारी क्षेत्रातील १०० गाव आजही होळी साजरी करत नाही. होळीच्या दिवशी गावातील सारेच जण सामान्य दिवसासारखं रोजचं काम करतात. या गावातील सारे रहिवाशी छिपला केदार देव यांना दैवत मानतात. याची नित्यनियमाने पूजा करतात. छिपला केदार देव हे भगवान शिव आणि भगवती यांचे एक रुप आहे. गावकरी या स्थानाजवळ एक प्रदक्षिणा घालतात व छिपला केदार येथील कुंडात स्नान करतात. याला गुप्त कैलाश असंही म्हटलं जातं.

मोठी बातमी! नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, मुंबईच्या समुद्र किनारी कोसळले हेलिकॉप्टर
पिथौरागढ जिल्ह्यात असणाऱ्या १००हून अधिक गावातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रंगपंचमी खेळल्याने त्यांच्या देवाची जागा अपवित्र होईल. तर, धारचुलायेथील अनवल समुदाय आणि मुन्सियारी येथील जोहार क्षेत्राचे बरपतिया गावातील आदिवासी समाजात आजही होळीबाबत अनेक मान्यता आहेत.

हरकोट गावात राहणारे खुशल हरकोटिया यांच्या म्हणण्यानुसार, रंगाचा सण असलेला होळी इथे अशुभ मानलं जातं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, या भागात होळी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर संकट ओढावलं आहे. तर, कोणाच्या कुटुंबातील सदस्यावर मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. तर कोणाच्या घरातील पशूधन चोरीला जातात. येथील स्थानिक गावकऱ्यांचा रंग खेळणे म्हणजे देवतेचा कोप होईल, असा समज आहे.

VIDEO: २५ वर्षांचा तरुण मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये यायचा, अन् मुलींच्या खोलीबाहेर…;
दरम्यान, इतिहासकार जयप्रकाश यांनी सांगितल्यानुसार, होळी कधीच पहाडी राज्यांमध्ये होळी साजरा करण्याची परंपरा कधीच नव्हती. या राज्यांमधील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचा होळीवर फारसा विश्वास नाहीये. पहाडी राज्यांचा पर्यटनामुळं विकास झाल्याने इथे दुसऱ्या राज्यातील व्यक्तींशी संपर्क आला त्यामुळं मुळ राज्यातील लोकांनी इतर रिती-रिवाज आपलेसे केले. मात्र, अजूनही काही गावांमध्ये होळी अपवित्र मानली जाते.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दोन दिवस १० टक्के पाणीकपात, शहरातील ‘या’ भागांना फटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here