कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघाचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आज चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त जात असताना शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला. उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी गद्दारी का केली असा जाब माने यांना विचारला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने बाचाबाची देखील झाली. मात्र, तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला करत खासदार धैर्यशील माने यांची गाडी पुढे मार्गस्थ केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी इचलकरंजी मध्ये जाहीर सभा घेत शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी शिवसैनिक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. धैर्यशील माने यांनी गद्दारी केल्यानं अनेक दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये खदखद निर्माण झाली होती, असं ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांनी सांगितलं आहे.

कॉलेजमध्ये माझ्यासोबतही रॅगिंगचा प्रकार, पंकजा मुंडेंनी ‘मटा कॅफे’त सांगितला किस्सा

उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी आज खासदार धैर्यशील माने यांचा ताफा आडवला. धैर्यशील माने हे आज सकाळी हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी अचानक ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी समोर येत त्यांचा ताफा अडवला. गद्दारी का केली असा सवाल विचारत जोरदार त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे गटाच्या शिवसैनिक पाहून शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील समोर आले आणि दोघांमध्ये हमरी तुमरी सुरू झाली. मात्र, तातडीने पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना बाजूला करत शांत केले आणि धैर्यशील माने यांचे गाडी पुढे मार्गस्थ केली.

व्वा रवींद्र… भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला भुईसपाट केला, उद्धव ठाकरेंकडून धंगेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप

शिवसैनिकांशी आणि ज्यांनी त्यांना निवडणुकीचे तिकीट दिले त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत धैर्यशील माने शिंदे गटात गेले. यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून प्रत्येक गावामध्ये त्यांना आडवत जाब विचारण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात अशा पद्धतीनेच सर्व गद्दारांना जाब विचारण्यात येईल ,असे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी म्हटले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांशी पंगा नडला, माजी मंत्री बच्चू कडू यांना धक्का, २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here