पुणे : सासू-सुनेचा वाद जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतो. क्षुल्लक कारणावरून होणारी तू तू मै मै प्रत्येक घरात दिसून येते. मात्र पुण्यातील विमान नगर भागात सासू सुनेचा वाद इतका टोकाला पोहोचला, की सुनेला जीव गमवावा लागला.

घरकाम जमत नसल्याचा आरोप करुन सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केला. ही घटना घडल्याचं समोर आल्यानंतर परिसरात अक्षरशः एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी विमान नगर पोलिसांनी जाऊन पाहणी केल्यानंतर सासूला अटक करण्यात आली.

रितू रवींद्र माळवी (वय २८ वर्ष, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (वय ४९ वर्ष) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितू माळवीला घरकाम जमत नाही तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करुन सासू कमला तिचा छळ करत होती. दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रीज उघडताना रितूला पाय लागल्याने वाद झाला होता. त्या वेळी रितूने सासू कमलाशी वाद घातला. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले.

सहा दिवसांपूर्वी दुसरं लग्न, २६ वर्षीय गे पार्टनरकडून हत्या, बिझनेसमनच्या खुनाचं गूढ उकललं
या घटनेत रितुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात रितुच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण‌ झाल्याचे उघड झाले.

रात्रीचं इडली सांबार जीवावर बेतलं, नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू
सासू कमलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करत आहेत.

फ्लॅटमध्ये आग; जीव वाचवण्यासाठी तरूणी खिडकीबाहेर स्लॅबवर बसून राहिली; अग्निशमन दलामुळे सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here