पुणे : पुण्याच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातील पैलवान स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज सकाळी ७.३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या मारुंजी येथील कुस्ती तालीममध्ये ही घटना घडली असून पैलवान ज्ञानेश्वर याच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता. सपाट्या मारल्यानंतर व्यायाम करून नुकताच बसला होता. मात्र, त्याला जागेवरचं हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला इतर पैलवानांनी पाहिले आणि रुग्णालयात दाखलही केले होते. मात्र, त्या अगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती.

भारताच्या वर्ल्डकप मोहिमेला मोठा सेटबॅक; बुमराहवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आली वाईट बातमी
स्वप्नीलने पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेतले होते. तसेच कात्रज येथे नुकत्याच झालेल्या एन.आय.एस. कुस्ती कोच परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच तो ‘महाराष्ट्र चॅम्पियन’ देखील होता. सद्या तो सर्व पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. तसेच अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी जात होता. स्वप्नील हा एक युवा पैलवान म्हणून परिचित होता. तो मूळचा मुळशी तालुक्यातील महाळूंगे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

खासदारांची गाडी येताच शिवसैनिक आले, धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती, ठाकरेंचा जयघोष, पोलिसांमुळं वाद टळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here