मध्य सुवाआन शहरातील शिनचियोंजी चर्चचे अध्यक्ष ८८ वर्षीय ली मॅन-ही यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यांनी चर्चमध्ये काहींजणांना लपवून ठेवले आणि खोटी माहिती देऊन करोनाबाबत उपाययोजना आखणाऱ्या पथकाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. अखेर जिल्हा न्यायलयाने ली यांच्या अटकेचे आदेश दिले.
वाचा:
ली आणि चर्चने तपास यंत्रणांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली. न्यायलयासमोर सत्य समोर यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चर्चचे प्रवक्ते किम यंग-उन यांनी सांगितले.
वाचा:
दक्षिण कोरियातील १४ हजार ३३६ करोनाबाधितांपैकी जवळपास ५२०० प्रकरणे या चर्चशी निगडीत आहेत. दाएगू शहरातील चर्च करोना संसर्गाचे मुख्य केंद्र झाले होते. या चर्चमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांपासून करोनाची बाधा झाली असल्याचे प्रशासनाने म्हटले. त्यानंतर देशाच्या इतर भागातही झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
वाचा:
या चर्चचे प्रमुख ली स्वत: ला येशूचा अवतार समजतात. त्यांनी शिन्जेऑन्जी चर्चची स्थापना १९८४ मध्ये केली होती. कोरियन भाषेत शिन्जेऑन्जीचा अर्थ ‘नवीन स्वर्ग आणि पृथ्वी’ असा होतो. ली हे त्यांच्यासोबत एक लाख ४४ हजारजणांना स्वर्गात घेऊन जाणार असल्याचा दावा त्यांच्या अनुयायांनी केला आहे. दक्षिण कोरियाबाहेर या चर्चचे २० हजार अनुयायी आहेत. या देशांमध्ये चीन, जपान आणि दक्षिण पूर्व आशियातील काही देशांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
These are actually great ideas in concerning blogging.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.