टॉयलेट सीट बदलताना प्लंबरला त्या खाली काहीतरी अडकल्याचं दिसलं. जेव्हा त्याने नीच पाहिलं तर ती अंगठी असल्याचं त्याला दिसलं. त्याने महिलेला फोन केला आणि याची माहिती दिली. महिला तात्काळ घरी आली आणि जेव्हा तिने ती अंगठी पाहिली ती अत्यंत भावून झाली आणि ढसाढसा रडू लागली. प्लंबरला कळेना काय झालंय, मी महिला का रडते आहे?
काही वेळाने महिला शांत झाली आणि तिने या अंगठीची संपूर्ण कहाणी सांगितली. ही काही साधीसुधी अंगठी नव्हती तर हिऱ्याची अंगठी होती. ही तिच्या साखरपुड्याची अंगठी होती. २१ वर्षांपूर्वी तिच्या लग्नापूर्वी तिच्या जोडीदाराने ती तिला दिली होती.
मात्र, दुर्दैवाने महिलेच्या लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी तिची ही अंगठी हरवली होती. त्यानंतर महिलेने ती अंगठी खूप शोधली पण तिला ती कुठेच सापडली नाही. आता २१ वर्षांनंतर जेव्हा महिलेने ती अंगठी पुन्हा पाहिली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने याबाबत सर्वांना सांगितलं तसेच तिने शोसल मीडियावरही तिची ही कहाणी शेअर केली आहे. या महिलेची कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.