तिरुअनंतपुरम: केरळमध्ये पॅराग्लायडिंग दरम्यान करताना एक मोठी दुर्घटना टळली. तमिळनाडूची एक पर्यटक केरळ फिरण्यासाठी आली होती. ट्रेनरसोबत पॅराग्लायडिंग करत असताना महिला पर्यटक ५० फूट उंच असलेल्या विजेच्या खांबावर अडकली. जवळपास २ तास दोघेही खांबावर अडकले होते. दोघांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

केरळचा वर्कला समुद्र किनारा फिरण्यासाठी तमिळनाडूतील एक पर्यटक आली होती. महिला पर्यटक ट्रेनरसह पॅराग्लायडिंग करत होती. दोघेही २ तास अडकले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पॅराग्लायडिंग करताना पॅराशूट एका विजेच्या खांबावर अडकल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
जिथे प्रसाद विकता, तिथे मटण देऊ? डिलिव्हरी बॉयचा नकार, स्विगीनं काढून टाकलं, पुढे काय घडलं?
पर्यटक आणि ट्रेनर ५० फूट उंच असलेल्या विजेच्या खांब्यावर अडकले. अग्निशमन दलाकडे इतकी उंची शिडी नव्हती. त्यामुळे दोघांचा जीव वाचवण्यासाठी खांब वाकवण्याची योजना आखण्यात आली. खांब्याच्या खाली गाद्या आणि जाळ्या टाकण्यात आल्या. यानंतर महिला पर्यटक आणि पॅराग्लायडिंग ट्रेनरला वाचवण्यात यश आलं. दोघांना वर्कलातील तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. पॅराग्लायडिंग प्रशिक्षक वर्कलाचा असून महिला तमिळनाडूच्या कोईम्बटूरची रहिवासी आहे.

दोघांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाची वाहनं पोहोचली. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचतील इतक्या उंच शिड्या अग्निशमन दलाकडे नव्हत्या. त्यामुळेच जवळपास २ तास दोघे खांब्याला लटकून होते.

पॅराग्लायडिंग दरम्यान याआधीही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी पॅराग्लायडिंग दोन जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात पॅराग्लायडिंग दरम्यान दक्षिण कोरियाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील एका ३० वर्षीय व्यक्तीचा पॅराग्लायडिंग करताना जीव गेला. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी परिसरात ही घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here