रायगड/पनवेल : मुंबई गोवा महामार्गावर पनवेलजवळ मोठा अपघात झाला आहे. या अपघातात इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या दीपेश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाड येथील कार्यक्रम आटपून ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी काळाने घाला घातला.

मुंबई – गोवा महामार्गावर पनवेल जवळील चिंचवण गावाजवळ हा मोठा अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मुंबई गोवा हायवे वर उभ्या असलेल्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अर्टिगा कारची धडक बसून झालेल्या अपघातात गाडीतील मोरेंचा मृत्यू झाला, तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ठाणे येथील इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह महाड येथील कार्यक्रम आटपून निघाले होते. आज सकाळी ठाणे बाजूकडे त्यांच्या ताब्यातील अर्टिगा गाडी क्र एमएच ०४ जीएम २४९५ ही घेऊन चालले होते. चिंचवण गावाच्या हद्दीत शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्यावर उभी होती. यावेळी हा मोठा अपघात झाला.

सहा दिवसांपूर्वी दुसरं लग्न, २६ वर्षीय गे पार्टनरकडून हत्या, बिझनेसमनच्या खुनाचं गूढ उकललं
या गाडीचा अंदाज न आल्याने अर्टिगा गाडी चालकाने शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गाडीमधील दीपेश मोरे हे गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्याने त्यांना लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मद्यपानासह व्हायग्राच्या दोन गोळ्या, नागपुरातील लॉजवर तरुणाचा मृत्यू, नेमकं कारण समोर
त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव व कोमल माने या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पनवेल पोलीस करत आहेत.

पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here