अयोध्याः अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी येत्या ५ ऑगस्टला भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते , आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजनाचा कार्यक्रम दाखवला जाणार आहे, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नेत्यांना भूमिपूजन कार्यक्रम दाखवण्यासाठी प्रशासन व्यग्र आहे. अयोध्येत येत नसलेल्या १० मोठ्या नेत्यांच्या नावांची यादी तयार आहे. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते अयोध्येतील भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहतील आणि त्यात सहभागी होतील.

भूमिपूजनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींसह एकूण पाच लोक मंचावर उपस्थित राहतील, असं सूत्रांनी सांगितलं. , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, नृत्य गोपाल दास मंचावर उपस्थित असतील. याखेरीज आणखी दोन संत उपस्थित राहतील. याशिवाय कोणताही नेता किंवा संत मंचावर उपस्थित राहणार नाहीत.

पंतप्रधान मोदी व्यतिरिक्त अवधेशानंद सरस्वती, उमा भारती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग आणि विनय कटियार यांनाही भूमिपूजनात सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. इतर कोणतेही केंद्रीय मंत्री या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. वय, आरोग्य आणि कोरोनाचे संकट पाहता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची अयोध्येत येण्याची शक्यता कमी होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here