भुवनेश्वर: ओदिशात एका २० वर्षीय मुलानं त्याच्या वडिलांची हत्या केली. यानंतर त्यानं सावत्र आईवर बलात्कार केला. जजपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली. तोमका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आरोपी तरुण दुसऱ्या गावात राहतो. त्याची सावत्र आई त्याला वडिलांसोबत राहू द्यायची नाही. रविवारी रात्री आरोपी वडिलांच्या घरी गेला. त्यावेळी सावत्र आई त्याच्यासोबत अतिशय उद्धटपणे बोलली. त्यानंतर आरोपीही तिला बरंच बोलला. यामध्ये वडिलांना हस्तक्षेप केला. ते त्यांच्या पत्नीच्या बाजूनं बोलले. त्यामुळे वाद चिघळला. यानंतर २० वर्षीय मुलानं त्याच्या ६५ वर्षीय वडिलांची धारदार शस्त्रानं हत्या केली.
तिच्या घरी काय करत होतास? तरुणाला खेचत बाहेर आणलं, जीव जाईपर्यंत मारलं; घटना CCTVमध्ये कैद
वडिलांना संपवल्यानंतर आरोपी मुलानं सावत्र आईवर बलात्कार केला. हत्या आणि बलात्कार करून आरोपी तिथून फरार झाला. या प्रकरणी महिलेनं पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला सोमवारी ताब्यात घेतलं. आरोपीच्या वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.
जिथे प्रसाद विकता, तिथे मटण देऊ? डिलिव्हरी बॉयचा नकार, स्विगीनं काढून टाकलं, पुढे काय घडलं?
नेमक्या कोणत्या कारणामुळे तरुणानं त्याच्या वडिलांची हत्या केली, सावत्र आईवर बलात्कार केला त्याचा शोध आम्ही घेत आहोत, अशी माहिती तोमका पोलीस ठाण्याचे प्रभारी एस. के. पात्रा यांनी दिली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा शोध आम्ही घेत आहोत. सावत्र आई आरोपीला त्याच्या वडिलांसोबत राहू देत नव्हती, असं पात्रा यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here