याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज तिवारी हा त्याचा मित्र खुशालसोबत होळीचे रंग खेळून आंघोळ करण्यासाठी सुराबर्डी येथील तलावावर पोहोचला होता. मात्र, दोन्ही तरुणांना पोहायला येत नव्हते. दरम्यान, तलावाच्या काठावरील पाण्यात उतरून त्यांनी आंघोळ सुरू केली. दरम्यान, राजचा पाय घसरला आणि तो तलावात बुडू लागला, त्याला वाचवण्याचा प्रयत्न खुशालने केला. मात्र राजला वाचविण्यात खुशालला यश आले नाही.
दरम्यान, खुशालही घसरला आणि पाण्यात बुडू लागला. तेथे उपस्थित लोकांनी खुशालला पाण्यातून बाहेर काढले, मात्र पाण्यात बुडल्याने राज तिवारीचा मृत्यू झाला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच वेळ मृतदेह हाती लागला नाही. त्यानंतर गोताखोर जगदीश खरे यांची मदत घेण्यात आली.
सुमारे अर्धा तास शोध घेतल्यानंतर गोताखोर जगदीश खरे यांनी राज याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
फ्लॅटमध्ये आग; जीव वाचवण्यासाठी तरूणी खिडकीबाहेर स्लॅबवर बसून राहिली; अग्निशमन दलामुळे सुटका