आरोपी मुलगी तन्नूचा सफीरपूरमधील एका तरुणाशी लग्न जुळलं होतं. त्यामुळे तिचा सावत्र भाऊ आणि प्रियकर शिवम नाराज होता. त्यामुळे या दोघांनी मिळून आईच्या हत्येचा कट रचला. ५ मार्चला तो शांती सिंह यांच्याशी बोलायला त्यांच्या घरी आला. त्या रात्री तो त्यांच्याच घरी थांबला. तन्नूही याच घरात आपल्या आईसोबत राहात होती. ६ मार्चच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास तन्नू आणि शिवमने मिळून चाकूने आपल्याच आईची हत्या केली. त्यानंतर या दोघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला.
शांती सिंह या तन्नूच्या शिक्षणासाठी शहरात भाड्याने राहत होत्या. तर सावत्र भाऊ शिवम हा उन्नावमधील पूर्वा शहरातील रहिवासी होता. आईची हत्या केल्यानंतर मृताची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तरुणीच्या मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे तिचा सावत्र भाऊ शिवम रावत याला ताब्यात घेतलं. शिवमच्या सांगण्यावरुन पोलिसांनी तन्नूलाही ताब्यात घेतले.
शिवम आणि तन्नू यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली. काही काळ यांनी पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या तपासापुढे त्यांनी अखेर गुडघे टेकले. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सावत्र भावासोबतच्या प्रेमप्रकरणात आई अडसर ठरत असल्याने या दोघांनी त्यांची हत्या केल्याचं कबुल केलं.
आईने मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असलेले सीओ सिटी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, आसपासच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे हत्येच्या आदल्या रात्री शिवम त्यांच्या घरी आला होता. सावत्र भाऊ शिवम आणि तन्नूचं प्रेमप्रकरण होतं. आईने या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. तर त्यांनी मुलीचं लग्नही दुसरीकडे ठरवलं होतं. म्हणून या दोघांनी कट रचून त्यांची हत्या केली.