पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हत्या, दरोडा अशा प्रकारच्या घटना वाढत असतानाच आता सोनसाखळी चोरांनी देखील शहरात धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसाला पाच ते सहा अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. अशाच प्रकारची धक्कादायक घटना शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडली आहे.

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोबत चालत असलेल्या १० वर्षीय नातीने चोरट्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. ऋत्वी घाग असं या धाडसी चिमुरडीचे नाव असून तिच्या या धाडसी कृत्याचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
चौथ्या कसोटीला भारत व ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची उपस्थिती, सामना किती वाजता सुरु होणार पाहा…
मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या लता घाग या ६० वर्षीय आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी २५ ते ३० वयाचा एक तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने आजीला पत्ता विचारला. आजी पत्ता सांगत असतानाच चोरट्याने आजूबाजूला पाहत डाव साधत आजीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरटा साखळी चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच आजीने जोरात चोर चोर असे ओरडण्यास सुरवात केली.

यावेळी आजीसोबतच असलेल्या १० वर्षीय ऋत्वीने धावत जात त्या चोराच्या तोंडावर हाताने मारण्यास सुरुवात केली. तर आजीने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याने हिसका देऊन तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ऋत्विच्या या धाडसी कृत्याने पुणे शहरात तिचे कौतुक होत आहे. मात्र, अशा चोरीच्या घटना वाढत असल्याने पुणे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा देण्याचं कारण काय? शरद पवारांचं चक्रावणारं स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here