रांची: खंडणीच्या उद्देशाने एका ९ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रांची शहरात घडली. रांची शहरातील बरियातू येथील एदलहाटू परिसरात ही घटना घडली आहे. रांची पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी संजू पांडा याला अटक केली आहे.

संजू पांडा हा पूर्वी त्याच्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहत होता, जे शौर्यच्या घरात भाडेकरू होते. खंडणीच्या उद्देशाने संजूने शौर्यचे अपहरण केले. मात्र, यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे नंतर त्याने शौर्यची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरुन तलावात फेकून दिलं.

एदलहाटू रहिवासी राजू यादव यांचा मुलगा शौर्यचे गेल्या शुक्रवारी संध्याकाळी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी नागडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सपारोम गावाजवळील तलावात त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. शौर्यच्या हत्येची बातमी पसरताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. मंगळवारी संध्याकाळी शेकडो लोकांनी रांचीमधील राजभवन-बुटी रस्ता तासभर रोखून धरला. लोकांनी बरियातू पोलीस ठाण्याला घेरावही घातला होता.

सावत्र भाऊ-बहिणीने कट रचून आईला संपवलं, २४ तासात गुन्ह्याचा छडा, हादरवणारं कारण समोर…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू पांडाची बहीण ही राजू गोपे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहते. संजूही त्याच्यासोबत राहत होता. यामुळे शौर्य त्यांच्यात मिसळला. संजू पांडा गेल्या काही महिन्यांपासून रांचीच्या पुंडग भागात खोली घेऊन वेगळा राहत होता. चुकीच्या संगतीत पडल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे शौर्यचे अपहरण करुन त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याची योजना त्यांनी आखली.

शुक्रवारी सायंकाळी शौर्य घराजवळील दुकानातून बिस्किटं घेण्यासाठी निघाले असता संजू गाडी घेऊन तेथे उभा होता. त्याने शौर्यला बोलण्याच्या बहाण्याने बोलावून त्याला दमदाटी करून गाडीत बसवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौर्य कारमध्ये आरडाओरड करु लागला. तेव्हा संजू पांडा घाबरला आणि त्याने त्याच्या डोक्यावर शस्त्राने तीन-चारवेळी वार केले. यामुळे शौर्य रक्त बंबाळ झाला आणि बेशुद्ध झाले. यानंतर संजूने गाडी नगडीकडे नेली.

पत्नीचं अफेअर, पतीची माफी, पुन्हा असं करु नको सांगितलं; पण प्रियकर ऐकेना, अखेर नको तेच घडलं…
तिथे त्याने त्याच्या डोक्यात सतत वार करून त्याचा खून केला आणि मृतदेह गोणीत टाकून तलावात फेकून दिला. त्यानंतर संजू त्याच दिवशी कोडरमा येथील त्याच्या घरी पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण आणि खंडणीचा प्लॅन करण्यासाठी संजूने ही कार भाड्याने घेतली होती. या घटनेत संजूसोबत इतर कोण कोण होते याची अद्याप माहिती नसून पोलीस तपास करत आहेत. मात्र, एका व्यक्तीच्या लालसेपोटी एका चिमुकल्याचा नाहक बळी गेल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here