मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने या दोन्ही गटातील नेते एकमेकांच्या समोर येत आहेत. आजही असंच झालं. उद्धव ठाकरे आज दुपारी विधानभवन परिसरात आले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. तर, उद्धव ठाकरे एन्ट्री करणार आणि तेवढ्यात समोर दीपक केसरकर होते. तेव्हा केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. पण, उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं, त्यांनी दुसऱ्यांदा नमस्कार केला, मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी बघितलं नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा दीपक केसरकरांनी नमस्कार केला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. यावेळी केसरकरांच्या चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होते.
तर, उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे आले. केसरकरांनी त्यांनाही नमस्कार केला. पण, आदित्य ठाकरेंनी केसरकरांकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि तेथून निघून गेले.
शिंदे गटाने बंड पुकारत उद्धव ठाकरेंचा हात सोडला. त्यानंतर त्यांनी भाजसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाणही ठाकरेंकडून हिरावून घेतलं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेत हे आता राजकीय राहिलेले नाहीत तर ते वैयक्तिक झाले आहेत. त्याचाच प्रत्यय आज विधानभवनातील या घटनेवरुन प्रकर्षाने दिसून आला.