आहे. सदर व्यक्तीला गुरुवारी रात्री चिंताजनक स्थितीत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याचा अहवाल आला आहे. ( )
वाचा:
करोनाने मृत्यू झालेला व्यक्ती हा पत्नीच्या बाळंतपणामुळे येथे १५ दिवस होता. तो चंद्रपुरात परतल्यावर त्याला ताप आला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कोविड-१९ ची लक्षणे आढळल्याने त्याला चिंताजनक स्थितीत गुरुवारी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. पण उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.
वाचा:
दरम्यान, तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचे २४ जुलै रोजी पहाटे २.३० वाजता निधन झाले होते. या महिलेला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खासगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते. ही महिला तेलंगणची मूळनिवासी असल्यामुळे या महिलेच्या मृत्यूची नोंद चंद्रपूर येथील करोना बाधित म्हणून झाली नव्हती. त्यामुळे आज झालेला मृत्यू हा जिल्ह्यातील पहिला करोनामृत्यू ठरला आहे.
वाचा:
राज्यात सर्वत्र करोनाने थैमान घातले आहेत. गेले काही दिवस करोनाचे दररोज ९ ते १० हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीडलाखाच्या वर गेली आहे. त्यात काहीसा दिलासा म्हणजे काही जिल्ह्यांत करोनाचा प्रादुर्भाव फारच कमी आहे. त्यात प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. चंद्रपुरात आतापर्यंत करोनाचे एकूण ४३० रुग्ण आढळले असून त्यातील २६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर सध्या १६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे करोना साथ राज्यात आल्यानंतर चार महिन्यांनंतर जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी गेला आहे. या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा लगेचच सतर्क झाली असून आवश्यकती सर्व खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी ४३ अॅक्टिव्ह रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Thank you for publishing this awesome article.