१९११साली मुंबईच्या समुद्र किनारी गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू बांधण्यात आली. त्यावेळी ब्रिटनचे किंग पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी क्वीन मेरी यांच्या भारतभेटीच्या निमित्ताने समुद्रात भराव घालून गेट वे ऑफ इंडियाची कमान उभारण्यात आली. तर, १९२४ साली सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. गेली १०० वर्ष ही वास्तू मुंबईच्या किनाऱ्यावर दिमाखात उभी आहे. देशतीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षण असलेली असलेल्या या वास्तूला आता तडा गेला आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारतीच्या दर्शनी भागात भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी वनस्पतीही वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. तर, घुमटावरील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचेदेखील नुकसान झालं आहे. त्यानंतर पुरातत्व विभागाने राज्य सरकारने ६.९ कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान, हा प्रस्ताव अद्याप मंजुर झालेला नाहीये. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन दिलं आहे. लवकरच नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वादळे आणि लाटांमुळं गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुला धक्का पोहोचल्याचं निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षात आलेल्या वादळांमुळं या वास्तूचं नुकसान झाल्याचं प्रथम लक्षात आले. त्यावेळी पुढील धोका लक्षात आला.