डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तब्बल १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, भाजप माजी नगरसेवक साई शेलार, मनापाडा पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि स्वयंमसेवक घटनास्थळी दाखल असून मदत कार्य सुरू आहे. ही आग कशामुळे लागली आणि यात काही जीवितहानी झाली आहे का? हे अद्याप समजलेले नाही.
गेल्या काही वर्षात डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्याना यापूर्वीही मोठं मोठ्या आगी लागल्या आहेत. प्रोबेस कंपनीमधील स्फोट, अंबर केमिकल कंपनीत स्फोट हे न विसरण्यासारखे आहेत. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसीमधील घातक केमिकल कंपन्या स्थलांतरीत कराव्या, अशी मागण्या नागरिकांची आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यावर अद्याप ठोस उपाय सरकाने काढलेला नाही. आणखी कुठलीही भीषण दुर्घटना होण्यापूर्वी सरकारनं लक्ष द्यावं, असं आवाहन करण्यात येत आहे.
ड्रॅगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लागली होती आग
डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये सोनारपाडा टेम्पो नाकाजवळ असलेली ड्रॅगर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लेदर बेल्ट बनविते. कंपनी बंद होती. संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला ही घटना घडली. या कंपनीतील कामगारांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली होती. ही मोठी आग होती. लांबूनही ती दिसत होती. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण आगीत कंपनी जळून खाक झाली होती.