अमरावतीः ऐन पिक काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पावसामुळं शेतातील गहू, हरभरासह द्राक्षे आणि इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोकणासह, मराठवाडा, विदर्भातील पावसामुळं शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

मागील तीन दिवसांपासून पश्चिम विदर्भासह अमरावतीत ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नव्याने अंदाज जाहीर करत हा आठवडा सोडला तर पुढील आठवड्यात पुन्हा हीच परिस्थिती उद्भवण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील रखडलेली कामे आत्ताच करुन घ्या, असं अवाहन केलं आहे. काढणीला आलेला हरभरा व आलेला कांदा काढून त्याचा पावसापासून बचाव होईल अशी योग्य नियोजन करण्याचे अवाहन हवामान विभागाने दिले आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या वास्तूला धोका?; पुरातत्व विभागाच्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर
हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनिल बंड यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज पासून वातावरण कोरडे राहील. पुढील दोन-तीन दिवसात विदर्भात कमाल तापमान ३८-३९° सेल्सिअसच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे. कोकण गोवा भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील. येत्या १४ ते १६ मार्च या कालावधीत विदर्भात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे गहु हरभरा पीकांची कापणी तातडीने पूर्ण करावी. संत्रा बहाराचे वाढीव तापमानापासुन रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुण्यात जागतिक महिला दिनाला गालबोट, दोन महिलांकडून आयुष्याची अखेर, परिसरात हळहळ…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here