BJP News | महाराष्ट्रातील भाजपचे नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर पक्षाकडून आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी विशेष समिती, विनोद तावडे यांच्याकडे निमंत्रकपदाची जबाबदारी.

हायलाइट्स:
- भाजप कोणत्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, याचा आढावा घेतला जाणार
- मोदी-शाहांचा तावडेंवरील विश्वास वाढला
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणत्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, याचीही माहिती समितीकडून घेतली जाणार आहे. या अभ्यासाअंती भाजपच्या या केंद्रीय समितीकडून संबंधित राज्यातील संघटनात्मक कार्यक्रम, नेत्यांच्या कार्यक्रमाचे आणि दौऱ्यांचे नियोजनही केले जाणार आहे. एकूणच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळातील प्रचार आणि रणनीती आखण्याची जबाबदारी या समितीवर असेल. या समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विनोद तावडे राष्ट्रीय स्तरावर आणि पर्यायाने महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा त्यांच्यावरील वाढलेल्या विश्वासाचे द्योतक असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यापूर्वी विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात त्यांनी बिहार आणि हरियाणाच्या प्रभारीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने विनोद तावडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. त्यादृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे केंद्रीय मंत्री सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.