Maharashtra Budget in Vidhanparishad 2023 | आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता देवेंद्र फडणवीस सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात करतील.

हायलाइट्स:
- शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प
- मंत्रिमंडळाच्या रचनेमुळे मोठा पेच
- विधानपरिषदेत अर्थसंकल्प कोण मांडणार?
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी दीपक केसरकर किंवा शंभूराज देसाई यापैकी एकाला प्राधिकृत केले जाऊ शकते. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात आले.
कालच विधानसभेत राज्य सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला होता. यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर ९.१ टक्के इतका असल्याचे नमदू करण्यात आले होते. आगामी काळात राज्यात अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. हा काळ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकप्रिय घोषणांची खैरात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषत: नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना सुरु करणार का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.