जालना : जालना जिल्ह्याच्या बदनापुर तालुक्यातील सायगांव इथे १३ वर्षीय अल्पवयिन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. अचानक बेपत्ता झालेल्या या मुलीचा तिच्या घरच्यांनी तसेच नातेवाईकांनी गावात शोध घेतला. परंतु, तिचा काहीच थांगपत्ता लागेना. अखेर ही घटना पोलिसांना कळवण्यात आली. घटनेचे गांभीर्य व मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ताबडतोब चक्रे फिरली आणि तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. गावातील पवन शिंदे या तरुणाने सदर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजे ते २० फेबुवारी २०२३ रोजीच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पळवून नेले होते. या एका माहितीच्या आधारावर बदनापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित पवन शिंदे यांच्या मोबाईलचे लोकेशन तसेच तांत्रिक बाबींचे विश्लेषण करत पोलीस उप निरीक्षक निवृती शेळके यांनी आरोपी तरुणाचा व घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे सुरू केले.

एक्स्प्रेस पकडण्यासाठी थेट पुणे स्थानकात जायची गरज नाही; आणखी एका स्टेशनवर ४ ‘एक्स्प्रेस’ना थांबा
तब्बल १२ ते १३ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पवन शिंदे यांच्या लोकेशनचे समजले. ते चिमडी, ता.खेड, जि.पुणे या ठिकाणी आढळून आले होते. ही महत्वाची माहिती हातात येताच बदनापूर पोलिसांच्या पथकाने तत्काळ पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चीमडी गाव गाठून संशयित आरोपी पवन शिंदे व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. दिनाक ६ मार्च सोमवारी या दोघांना पोलीस ठाणे बदनापूर येथे आणल्यानंतर या १३ वर्षिय अल्पवयीन पीडितेची पोलिसांनी सखोल विचारपुस केली असता आरोपी पवन शिंदे याने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती दिली.

पवन शिंदे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला धाक दाखवून तसेच फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन शिंदे याच्या विरुद्ध बलात्कार, पोस्कोसह अट्रासिटी कायदाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास बदनापूर पोलीस करीत आहेत.

महाराष्ट्र हादरला! शाळेतून घरी आली की गप्प-गप्प होती चिमुरडी, वडीलांनी प्रेमाने विचारताच थरकाप उडाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here