वॉशिंग्टन: जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये फैलावला असून संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या विषाणूवर संशोधन सुरू आहे. संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. करोनाच्या संसर्गाचा संबंध वटवाघुळांशी लावण्यात येत असून त्याबाबतही संशोधन सुरू आहे. वटवाघुळांमध्ये करोना विषाणू हा जवळपास ४० ते ७० वर्षांपासून असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

पेन्सिलवेनिया स्टेट यूनिव्हर्सिटीचे संशोधक मेसीज बोनी यांनी म्हटले की, करोना विषाणू हा ‘हॉर्सशू’ या वटवाघुळाच्या प्रजातीत आढळला आहे. विशेष म्हणजे अनेक दशकांपासून तो या वटवाघळांमध्ये पसरत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नव्हती. संशोधकांनुसार, सध्या जो कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत आहे, त्याचे मूळ विषाणू वटवाघुळांमध्ये ४० ते ७० वर्षांपासून अस्तित्वात आहेत.

वाचा:

वटवाघुळांमध्ये इतरही विषाणू असू शकतात. यामुळे इतर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याचा संशोधक मेसीज बोनी यांनी सांगितले. करोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यावरच या संशोधनातून प्रश्न उपस्थित केले आहेत.

वाचा:

‘ग्लासगो विद्यापीठा’चे संशोधक प्रा. डेविड रॉबर्टसन यांनी सांगितले की, करोना पसरवणारा विषाणू हा वटवाघुळांमध्ये असलेल्या विषाणूशी मिळता जुळता आहे. अनेक वर्षांपूर्वी हा विषाणू आपल्या मूळ विषाणूपासून वेगळा झाला. या विषाणूचा संसर्ग माणसापर्यंत कसा आला, हे आपल्याला जाणून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:

सध्याच्या परिस्थितीत करोना विषाणूची उत्क्रांती समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना संसर्ग वाहक असलेल्या प्राण्यांना वेगळं करणे सोपं जाईल. त्यामुळे भविष्यातील संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते, असे संशोधक मेसीज बोनी यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here