अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबईच्या पोलीस पथकाने काल रात्री अहमदनगर जिल्ह्यात रुईछत्तीशी या गावात मोठी कारवाई केली आहे. तेथून एका मुख्याध्यापकासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली. प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रूपयांना विक्री केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तीच प्रश्नपत्रिका दादर येथील परीक्षा केंद्रावर पकडण्यात आल्याने हा प्रकार उजेडात आला.

मुंबईच्या या पथकाने त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यात तपास करताना अहमदनगर जिल्ह्यातील धागेदोरे हाती लागले. त्यानुसार पथक नगर तालुक्यातील रूईछत्तीशी गावात आले. तेथून किरण दिघे, अर्चना भामरे, भाऊसाहेब अमृते, वैभव तरटे, सचिन महारनवयांना ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात आले. मुख्याधापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे.

कोणी फोडला १२ वीच्या गणिताचा पेपर, आरोपीला शोधण्यात पोलिसांना मोठं यश; नाव वाचून हादराल…
१२ वीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबईत दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिथे हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करताना पोलिसांना याचे धागेदोरे अहमदनगरच्या रूईछत्तीशी गावातही असल्याचे आढळून आले. इथे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. फोडलेल्या या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एक्स्प्रेस पकडण्यासाठी थेट पुणे स्थानकात जायची गरज नाही; आणखी एका स्टेशनवर ४ ‘एक्स्प्रेस’ना थांबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here