नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात अपघातामध्ये एक मुलगा जागीच ठार झाल्यामुळे मुलाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बसचालक शिव कैलास रामेश्वर यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसने स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे स्कुटीवरून मुलगा खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पनवेल येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने अपघात पाहणाऱ्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली. अपघातात मुलाच्या अंगावरून बसचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृ्त्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

रिषवराज जीवेश झा, असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. मागून आलेल्या बसने त्याच्या स्कूटीला जोराची धडक मारली. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याचवेळी बसचं चाक त्याच्या अंगावरून गेलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर काही वेळात पोलिसांचा ताफा तिथं दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती पाहिल्यानंतर तिथल्या काही प्रवाशांची चर्चा केली.

महिला अभियंत्यांमुळे कोट्यवधीची वीजचोरी उघड; वीजचोरी प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली
अपघातानंतर मुलाचा मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बसचालक शिव कैलास रामेश्वर यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन पनवेल फूड कोर्ट हॉटेल समोरील रस्त्यावर सेक्टर ११ येथे हा अपघात झाला आहे. अपघाताची बातमी मुलाच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. बस चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बसच्या चालकाची सुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी; ‘… त्या पदवीचा मान सन्मान वाढला’- CM शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here