सांगलीः आष्टा या ठिकाणी एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५,असे या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंधतून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

आष्टा शहरातल्या नागावर रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला असता सदर तरुणाचा गळा घोटून केल्याचं निदर्शनास आले. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५, मुळगाव सोन्याळ,तालुका जत, सध्या राहणार आष्टा-नागाव रोड,असे तरुणाचं नाव आहे. या हत्ये प्रकरणी आष्टा पोलिसांनी नवनाथ विठ्ठल ऐवळे, या संशयित तरुणास अटक केली आहे.

होळी खेळून एकत्रच अंघोळीला गेले,१ तास झाला बाहेर आलेच नाही, एक चूक अन् दाम्पत्याचा दुर्दैवी अंत
शिवाजी कुलाळ, हा वन विभागाच्या नागाव रोडवरील जागेवरील झोपडपट्टी मध्ये राहत होता. उसाच्या वाडा विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय होता. झोपडी शेजारीच सोशल नवनाथ ऐवळे राहत होता.काही दिवसांपूर्वी शिवाजी आणि नवनाथ या दोघांच्या मध्ये जोरात भांडण झाले होते. नवनाथ याच्या एका नात्यातील महिलेबरोबर शिवाजीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय नवनाथ याला होता. या विषयावरून त्या दोघांमध्ये भांडण होऊन, तू त्या महिलेचा नाद सोड, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी नवनाथ याने मृत शिवाजी याला दिली होती. सदरची भांडण ही शिवाजी याचा भाऊ विलास कुलाळ यांनी सोडवली होती.
शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेआधी करून घ्या शेतीचे कामे, असा आहे हवामान विभागाचा अंदाज
त्यामुळे आपल्या भावाचा खून हा नवनाथ यांनीच केल्याचा संशय व्यक्त करत विलास कुलाळ यांनी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये नवनाथ याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार आष्टा पोलिसांनी नवनाथ ऐवळे याला अटक केली आहे, अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या वास्तूला धोका?; पुरातत्व विभागाच्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर

आमचं बहिण-भावाचं नातं; सोलापुरात टोळक्यांचा धुडगूस; लव्ह जिहादचा संशय घेत तरुणास मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here