करोनाच्या भीतीमुळे दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी चलनी नोटा वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यामुळे नोटा खराब झाल्या. तर, काहीजणांनी करोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी नोटा ओवनमध्ये ठेवून गरम केल्या. मात्र, या नोटा बऱ्याच प्रमाणात जळाल्या. दक्षिण कोरियाच्या रिझर्व्ह बँकेकडे आता या खराब झालेल्या नोटांचा खच पडला असून याचे मूल्य ट्रिलियन डॉलरच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा:
रिझर्व्ह बँक ऑफ दक्षिण कोरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ कोरियाने म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत लोकांनी २०१९ च्या तुलनेत तीनपट जास्त जळालेल्या नोटा बदलल्या आहेत. जानेवारी ते जून या कालावधीत १.३२ अब्ज वॅन (१.१ अब्ज डॉलर्स) जळालेल्या नोटा बँकेत परत आल्या आहेत. यामागे असल्याचे प्रमुख कारण आहे.
वाचा:
यावर्षी ओवनमध्ये चलनी नोटा जळाल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचे बँकेने म्हटले आहे. चलनी नोटांमधून करोना विषाणूचा प्रसार होण्याच्या भीतीने लोकांनी ओवनमध्ये या नोटा, नाणी ठेवल्या होत्या. २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांत एकूण २.२ ट्रिलियन डॉलर्सच्या फाटलेल्या आणि जळालेल्या नोटा-नाणी बँकेकडे जमा करण्यात आल्या आहेत.
वाचा:
मायक्रोओव्हनशिवाय या चलनी नोटा आणि नाणी करोनारहित करण्यासाठी वॉशिंग मशीनचा देखील वापर करण्यात आला आहे. उम नावाच्या एका व्यक्तीनं ३० हजार डॉलर्सच्या नोटा बदलल्या. या नोटा त्यानं वॉशिंग मशिनमध्ये धुतल्याने या नोटा फाटल्या. पण यामुळे त्याचं नुकसान देखील झाले. जवळपास त्याच्या मूळ रक्कमेपैकी ३५ टक्के रक्कम नष्ट झाली. कुटुंबातील सदस्यांकडून ही रक्कम त्याला मदत म्हणून मिळाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान झाल्यामुळे त्याच्या चिंतेत वाढ झाली.
फैलावल्यानंतर चीननेदेखील बहुतांशी नोटा बदलून नवीन नोटा वितरीत केल्या होत्या. मात्र, कोरियन नागरिकांनी भीतीपोटी केलेल्या वर्तवणुकीमुळे त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.