बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी दिपक आणि टिना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबीय जोडप्याच्या घरी गेले. त्यांच्याकडे असलेल्या किल्लीच्या मदतीनं त्यांनी दार उघडलं. त्यावेळी त्यांना दिपक आणि टिना बाथरुममध्ये पडलेले आढळून आले. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पंत नगर पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शाह दाम्पत्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दिपक आणि टिना यांना अपत्य नव्हतं. फ्लॅटमध्ये ते दोघेच राहायचे. अंघोळ करताना त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. दोघांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीदत्त सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे जोडप्याचा मृत्यू कसा झाला, या प्रश्नाचं उत्त अद्याप मिळू शकलेलं नाही. पुढील तपासासाठी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे