नवी दिल्ली : एखाद्या पगारदार व्यक्तीसाठी आपल्या पगारातील काही हिस्स्याची बचत करणे सर्वात मोठी गरज असते. आणि यासाठी पहिले पाऊल म्हणजे बचत खाते उघडणे. बचतीसाठी अनेक जण पोस्टाला प्राधान्य देतात. पोस्टात बचत खाते उघडून आपली शिल्लक ठेवली जाते. पोस्ट ऑफिस बचत खाते हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन, पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत उघडले जाऊ शकते. पोस्ट ऑफिस ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी अनेक मार्ग प्रदान करते. पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी अनेक पर्याय देतात. या पद्धतींमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतींचा समावेश आहे.

अशा प्रकारे आपण शिल्लक जाणून घेऊ शकता
१. पोस्ट ऑफिस बचत खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे तपासू शकता. एसएमएसद्वारे शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी, ग्राहकांनी Balance टाइप करून ७७३८०६२८७३ वर पाठवावे. काही मिनिटांत तुम्हाला पोस्ट ऑफिसची शिल्लक मिळेल.

पोस्ट ऑफिसची शानदार योजना! एकदा पैसे जमा करा, दरमहा उत्पन्नाची हमी, जाणून घ्या कसे
२. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ८४२४०५४९९४ वर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि काही मिनिटांतच तुमच्या खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे येईल.

३. पोस्ट ऑफिस बचत खात्याची शिल्लक रक्कम जाणून घेण्याचा IPPB मोबाइल ॲप हा आणखी एक मार्ग आहे. या ॲपद्वारे तुम्हाला सहजपणे तुमची शिल्लक समजेल.

पोस्टाच्या ‘या’ योजनांमधून म्युरिटीपूर्वी पैसे काढू नका, भरावा लागेल दंड; गुंतवणूकदारांनो, काळजी घ्या!
४. ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी ई-पासबुक सेवा किंवा इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) देखील वापरू शकतात.

५. IVRS द्वारे शिल्लक तपासण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून १५५२९९ वर कॉल करणे आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

…म्हणून बँकेऐवजी पोस्टात बचत खाते उघडणे आहे फायदेशीर, कर सूटसह मिळतात अनेक सुविधांचा लाभ
६. पोस्ट ऑफिस बचत खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी नेट बँकिंग हा आणखी एक सोयीचा मार्ग आहे. ग्राहक पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.

७. ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये QR कोड स्कॅन करू शकतात. त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल, ज्यावरून त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेचा संदेश मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here