free delivery if a girl is born on women’s day, महिला दिनी मुलगी जन्माला आली तर मोफत डिलिव्हरी; नंदुरबारच्या डॉक्टर दाम्पत्याचं एक नंबर काम – free delivery if a girl is born on women’s day an initiative of a doctor couple from nandurbar
नंदुरबार : भारतीय समाज आज कितीही पुढारलेला असला तरीही कन्येचा जन्म झाल्यास नाक मुरडण्याची बुरसटलेल्या मानसिकतेचा प्रत्यय कित्येकदा येतो. यामुळेच की काय अशी मानसिकता बदलण्यासाठी नंदुरबारच्या ठाकरे डॉक्टर दाम्पत्याने पुढाकार घेत महिला दिनाचे औचित्य साधत मोठा संकल्प सोडला. मातेच्या प्रसूतीनंतर कन्या जन्म झाल्यास प्रसूती खर्च न घेण्याचा सोडलेला संकल्प पूर्ण केला आणि ठाकरे दाम्पत्याने अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
महिलांकडून राज्यात सर्वत्र महिला दिन साजरा केला गेला. दुसरीकडे नंदुरबारमधील नामांकित एका डॉक्टर दाम्पत्याने महिला दिनानिमित्त प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना व त्यांच्या परिवाराला एक अनोखी भेट दिली आहे. शहरातील स्पर्श रुग्णालयात ८ मार्चला मुलगी जन्माला आली तर प्रसूतीचा खर्च न घेण्याचा संकल्प त्यांनी केला होता. महिला दिनी या त्यांच्या रुग्णालयात दोन कन्या जन्माला आलेल्या आहेत. त्यांचं या डॉक्टर दाम्पत्याने आनंदात स्वागत केलं. डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि डॉक्टर प्रिती ठाकरे यांनी हा उपक्रम राबवला. कन्या जन्माचे स्वागत आनंदाने व्हावं समाजात मुलींची संख्या वाढावी या हेतूने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील नामांकित स्पर्श नर्सिंग होम आणि डॉक्टर दाम्पत्य सध्या चर्चेत आहे. रुग्णालयात जन्मलेल्या मुलीच्या पित्याने डॉक्टर दाम्पत्याच्या संकल्पनेचे कौतुक केले. जन्मलेला मुलीच्या आईनेही आनंद व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले.
जगातील टेक्नोक्रॅटस करु शकले नाहीत ते नंदुरबारच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं, अॅपल कंपनीकडून मिळाले ११ लाख घराण्याचा वंश चालविण्यासाठी केवळ मुलगाच वंशाचा दिवा असतो, अशी संकुचित मानसिकता असणाऱ्यांना मुलगी वंशाची पणती, असते हा संदेश डॉक्टर दाम्पत्याने आपल्या कृतीतून दिला आहे. एक प्रकारने पुरुष मक्तेदारीच्या समाजातील बुरसटलेल्या मानसिकतेला ही चपराकच म्हणावी लागेल. यामुळे कन्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ठाकरे डॉक्टर दांपत्याच्या या उपक्रमाचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.