मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीच्या सत्राला ब्रेक लागल्याचे दिसत असून या काळात टाटा समूहाच्या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा देत मालामाल केलं आहे. गेल्या चार दिवसांपासून टाटा समूहातील या स्टॉकला सतत अप्पर सर्किट लागत असताना गेल्या आठवडाभरात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. काल देखील हा शेअर अप्पर सर्किटवर क्लोज झाला होता. हा शेअर टाटा ग्रुपची कंपनी टीटीएमएलचा (टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड) आहे. टाटा समूहाच्या दूरसंचार क्षेत्रातील या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत असून गेल्या पाच दिवसांत स्टॉक २५ टक्केहून अधिक वधारला आहे.

या आधी या समभागात सातत्याने घसरण नोंदवली जात होती. २९० रुपये प्रति शेअरवरून सततच्या घसरणीनंतर २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेअर ५२.१० रुपयाच्या पातळीवर घसरला. पण आता त्यात तेजी दिसून येत असून येत्या काळात स्टॉक बंपर नफा कमवेल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे.

Gautam Adani News: गौतम अदानी रिटर्न्स! शेअर्सची घोडदौड, १० दिवसांत कमावला बक्कळ नफा
शेअर्स विक्रीसाठी गुंतवणूकदारांचा नकार
टाटा समूहातील या शेअरमध्ये आज जोरदार खरेदी होताना दिसत आहे. याशिवाय ज्यांनी आधीच हा शेअर खरेदी केला आहे, ते होल्ड करून ठेवत आहे म्हणजेच गुंतवणूकदार ते विकायला तयार नाही. गेल्या आठवड्यापासून सततच्या अप्पर सर्किटनंतर हा स्टॉक ६८ रुपये प्रति शेअरच्या जवळपास व्यवहार करत असून ५२ आठवड्यांच्या उच्चांकाकडे वाटचाल करत आहे. अशा स्थितीत आगामी काळात शेअर पुन्हा एकदा मालामाल करेल असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. विशेष म्हणजे या टाटा स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

बाजी पलटली! हिंडेनबर्गचा वार फुस्स, गौतम अदानी दर सेकंदाला कोटींची कमाई करू लागले
टाटा शेअरचा बंपर परतावा
टाटा समूहातील या शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर गेल्या तीन वर्षात स्टॉकने गुंतवणूकदारांना २५४५ टक्क्यांहून अधिक बंपर परतावा दिला. तर मागील पाच वर्षात या शेअरने १०७२ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पण शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. शेअरबद्दल कोणतीही माहिती नसताना गुंतवणूक केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

(नोट: वर दिलेला तपशील शेअरची एकूण कामगिरी आहे आणि याला गुंतवणुकीचा सल्ला मानला जाऊ नये. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमच्या अधीन असते, त्यामुळे कुठेही पैसा गुंतवण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here