या प्रकरणी गाडी चालक राजेंद्र घार्गे (वय ५९ वर्ष, रा. उपळी मायणी) यांच्या विरोधात चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती याप्रमाणे येवलेवाडी या ठिकाणी राहणाऱ्या शुभांगी जाधव व त्यांचे पती विक्रम जाधव हे दोघेही पती-पत्नी द्राक्ष विक्री आणि वडापाव व्यवसाय करतात. बुधवारी जाधव दापत्य द्राक्ष विक्रीसाठी रस्त्यावर बसले होते, यावेळी शरद जाधव हे आपल्या दुचाकीवरून द्राक्ष खरेदी करण्यासाठी आले होते आणि ते आपली दुचाकी लावून द्राक्ष खरेदी करत होते.
याच वेळी राजेंद्र घार्गे यांची चारचाकी गाडी भरधाव आली आणि त्याने थेट शुभांगी जाधव यांना पहिल्यांदा उडवले, त्यानंतर विक्रम जाधव आणि शरद जाधव यांना देखील उडवले, मग जरा पुढे जाऊन दुचाकीवर थांबलेल्या मुकुंद शेवाळे या तरुणाला देखील उडवले.
या भीषण अपघातामध्ये शुभांगी जाधव जागीच ठार झाल्या. तर अन्य तीन जण हे जखमी झाले. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी राजेंद्र घार्गे यांच्या विरोधात दाखल झाला असून अधिक तपास चिंचणी-वांगी पोलीस करत आहेत.
केंद्रीय मंत्र्यांचं भाषण संपलं अन् मंडप थेट कोसळला; घटनेत अनेक महिला जखमी, तर कार्यक्रम अर्ध्यावर गुंडाळला