जिल्ह्यात धुलिवंदनाचा सन उत्साहात साजरा झाला. या दिवशी घराघरात चिकन, मटण शिजलं. अशात चिकन बनवून दिलं नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हात आरवट येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हातील आरवट येथील राजेश कश्यप याने धुलिवंदनाचा दिवशी मद्य प्राशन केलं. त्याच अवस्थेत तो घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीपुढे चिकन खायची इच्छा व्यक्त केली. मात्र, सकाळचं जेवण शिजवून झालं होतं. त्यामुळे पत्नीने “रात्री चिकन बनवणार”, असं सांगितलं. पत्नीने नकार देताच राजेश संतापला.
राजेशने अंगणात असलेला लाकडी दांड्याने रेखाच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात रेखाला गंभीर जखम झाली. रक्तबंबाळ अवस्थेत रेखा जमिनीवर कोसळली. शेजारी असलेली रेखाची बहीण धावून गेली. त्यानंतर जखमी अवस्थेत रेखाला दुचाकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी महिलेचा पती राजेश कश्यपविरुद्ध कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.