डोंबिवली : डोंबिवलीत राहणाऱ्या वृद्ध महिलेने वयाच्या १०१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच आठवड्यात त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसात त्यांनी जगाचा निरोप घेतला. आजींनी शंभरीनंतरही स्वतःची कामं स्वतः करण्यावर भर दिला होता. त्यांची स्मरणशक्ती अजूनही दांडगी होती. खापर पतवंडांसोबत खेळलेल्या आजींच्या निधनाने कुटुंबात पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे.

डोंबिवली मधील एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर मध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेचे निधन झाले. रुक्मिणी अनंत प्रभुदेसाई यांची प्राणज्योत आज गुरुवारी सकाळी मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय तब्बल १०१ वर्ष इतके होते.

नुकतीच 3 मार्च रोजी त्यांच्या वयाला १०१ वर्षे पूर्ण झाली होती. आपल्या कुटुंबीयांसोबत आजींचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला होता.

विशेष म्हणजे त्या स्वतःचे काम स्वतः करीत असत. घरचे जेवण करताना त्या सुना आणि नातींना मदत करीत असत. रुक्मिणी यांनी लेकींपासून नातवंडांपर्यंत अनेक बाळंतपणे केली आहेत.

रुक्मिणी अनंत प्रभुदेसाई यांची स्मरणशक्ती या वयातही चांगली होती. निवडणुकीत त्या आवडीने मतदानाला जाऊन आपला हक्क बजावत असत.

उशीर झाला तरी घरी परतल्या नाहीत, शोधाशोधीनंतर लताबाई मृतावस्थेत आढळल्या, साताऱ्यात खळबळ
नुकत्याच त्या काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीकडे बंगळुरु येथे वास्तव्यास गेल्या होत्या. तेथेच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले व तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

रात्रीचं इडली सांबार जीवावर बेतलं, नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, खापर पतवंडे असा मोठा परिवार आहे. विशेष दुर्मिळ योग म्हणजे खापर पणतू/पणती यांच्या सहवासात त्यांनी त्यांच्याशी खेळून दिवस काढले होते.

होळीच्या दिवशी सर्वांसोबत फोटो काढले अन्…; सतीश कौशिक यांनी केलेली ती पोस्ट शेवटची ठरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here