२००९ मध्ये मनोज वेल्हा आणि ईनेज नेल्सन यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांनी एक मुलगी झाली. २०१६ पर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र २०१७ ला कौटुंबिक वादातून त्यांनी विभक्त होण्याचं ठरवलं. मात्र २०१७ ला ईनेज नेल्सन मुलीला घेऊन पुण्यात आल्या. तेव्हापासून वडिलांनी मुलीला पाहिलेलं नाही. जानेवारी महिन्यात मनोज त्ंयाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्यात आलं होतं. याची माहिती त्याने फोन करून त्याच्या पत्नीला दिली. मात्र पत्नीनं काहीही न ऐकता ९ सेकंदांत फोन ठेवला. मनोज यांनी अनेक प्रकारे मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही मार्गाने संपर्क होऊ शकला नाही.
मनोज वेल्हा यांच्या पत्नीने श्रीलंकेच्या कोर्टात विभक्त होण्याची याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत त्यांनी पुण्यातल्या गुरुवार पेठेतील पत्ता दिला आहे. याबाबत त्यांनी पुण्यात येऊन खडक पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दिला. मला फक्त माझ्या मुलीला पाच मिनिटं भेटायचं आहे. तिच्या वाढदिवसानिमित् आणलेल्या काही भेटवस्तू तिला द्यायच्या आहेत. त्यासाठी १८ जानेवारीपासून आजपर्यंत फेऱ्या मारतो आहे. मात्र तिला आजतागायत भेटता आलेले नाही, असं मनोज यांनी अर्जात नमूद केलं आहे. मनोज यांची पत्नी समोर येत नाही. त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नाही. तिच्याकडून वेगवेगळी कारणं दिली जातात. त्यामुळे आता मनोज यांनी पोलिसामार्फत कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे