मिळालेल्या माहितीनुसार, दोन वाजेच्या सुमारास सुरगाणा – नाशिक ही एसटी बस वणी सापुतारा रस्त्यावरुन येत असताना खोरिफाटा परीसरात या एसटीने दोन दुचाकींना धडक दिली. अनियंत्रित वेगातील दडकेनं दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. एका दुचाकीवरील आठ महिन्यांचा चिमुकली आणि तिचे आई – वडील हे जागीच ठार झाले आहेत. विशाल नंदु शेवरे (वय २४), अम्रुता विशाल शेवरे, मुलगी (वय 8 महिने), सायली विशाल शेवरे (वय २२) सर्व राहणार सारोळे खुर्द. निफाड, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.अपघातानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जखमीना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खोरीफाटा परीसरात एक दुचाकी रस्त्यालगत उभी होती व त्यावरील लोक झाडाखाली बसलेले असताना या दुचाकीला, धडक देत समोरुन येणाऱ्या आणखी एका दुचाकीला धडकत दिली यावेळी सुमारे तीस ते पस्तीस मिटर अंतरापर्यत या दुचाकीला फरफटत नेले व या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला
दरम्यान, एस टी बसमधील देखील काही प्रवासी जखमी झाल्याची माहीती मिळाली आहे. अपघातानंतर वनी सापुतारा महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबली होती पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुस लावल्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. तर या भीषण अपघातात मृत्यू पावलेले दुचाकीवरील हे सारोळा खुर्द तालुका निफाड येथील असल्याची माहीती मिळाली आहे.
कालच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आज जिल्ह्यातीलच वनी सापुतारा महामार्गावर एकाच कुटुंबातील दुचाकी वरील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एस टी चालकाच्या अनिंयत्रीत वेगामुळे व दुर्लक्षामुळे एकाच कुटुंबातील तिघे मृत्युमुखी पडले आहेत.