मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप सरकारला पाठिंबा दिल्याचे पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ‘५० खोके-एकदम ओके’ म्हणत विरोधकांनी हैरान करुन सोडलं. त्यातून भाजपने शिंदे गटाच्या आमदारांना पैसे दिल्याचा एकप्रकारे दावाच विरोधकांनी केला. आता नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपप्रणित शासनाला पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचण्याची संधी सोडली नाही. ५० खोके, नागालँड ओक्के… अशी घोषणा गुलाबरावांनी देताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला.

“या देशात आणि राज्यात बदलेचा वारे वाहायला लागल्याची वक्तव्ये मी वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ऐकली. काल नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचंही मी पाहिलं. मलासुद्धा असं वाटतं की नागालँडमध्ये ५० खोके-सबकुछ ओक्के झालंय का? अशी शंका निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे, तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचं, हे राष्ट्रवादीलाच जमू जाणं. पण खरंच नागालँडमध्ये ५० खोके, सबकुछ ओक्के असं झालंय का? असा सवाल करत गुलाबरावांनी डिवचल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ सुरु केला.

राज्य कर्जाच्या खाईत, फडणवीसांनी शब्दांचे इमले बांधले, जनतेला स्वप्नात फिरवून आणलं, अजितदादांकडून अर्थसंकल्पाची चिरफाड
अजित पवार संतापले

गुलाबरावांनी नागालँडवरुन राष्ट्रवादीला कोडिंत पकडण्याचा प्रयत्न केल्यावर आणि राष्ट्रवादीने ५० खोके घेतले का? असा सवाल केल्यावर अजितदादा विधानसभेत संतापले. आज राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. केंद्र सरकार तुमचं आहे. सगळ्या चौकशी यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत. मग आरोप कसले करता, सरळ चौकशी करा ना.. ही कुठली पद्धत काढली, अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता वार्षिक १२ हजारांचा सन्माननिधी मिळणार, अर्थमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
एकनाथ शिंदेंनीही अजित पवार यांना घेरलं

गुलाबराव पाटील-अजित पवार यांच्यात तू तू मैं मैं सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही टायमिंग साधलं. जो शिशे के महल में रहेते हैं-वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते.. असा शेर म्हणत आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून… असं कसं चालेल दादा…. म्हणत गुलाबरावांच्या आरोपांना धार देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर दुसऱ्यांवर आरोप करताय आणि तुमच्यावर आरोप झाल्यावर चिडता कशाला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनीही मजा घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here