राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
मनसेच्या वाटचालीची माहिती देणारी डिजिटल पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. ‘राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडणारा देशातील पहिला राजकीय पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ अशी स्लाईड यावेळी दाखवण्यात आली. त्यावर राज ठाकरे किंचित हसले आणि किस्सा सांगू लागले.
‘एका पत्रकार परिषदेमध्ये मला एका पत्रकाराने विचारलं, तुमची ‘ब्लू फिल्म’ जी आहे आलेली… मी म्हटलं, ती काढली असती तर बरं झालं असतं, यांनी बघितली तरी असती. ब्लू प्रिंट काढली कोणी बघितलीच नाही. अगोदर सगळे विचारायचे, यायच्या आधी.. काय कुठेय, ब्लू प्रिंट कुठेय? ज्या दिवशी जाहीर केली, आजपर्यंत मला कोणी विचारलेलं नाही त्या गोष्टीवर.. कारण स्वतः काही वाचली नाही.. हॅ वाचायची आहे… पाहायला दिली असती तर पाहिली असती… पण त्याच्यावर एकही कोणी प्रश्न विचारत नाही’ असं राज ठाकरे सांगत होते.
राज ठाकरेंसाठी साॅफ्ट काॅनर्र अन् बाळासाहेबांचा लाभलेला सहवास; रवींद्र धंगेकर भरभरून बोलले
राज ठाकरेंच्या सभांना नेहमी गर्दी होते, मग मतं का नाही मिळत? असा प्रश्न मला विचारला जातो. मग १३ आमदार काय सोरटवर आले का? अशी कोपरखळी राज ठाकरेंनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. काँग्रेसची काय अवस्था झालेय ते पाहा. ज्या पक्षाने भारतावर ६५ ते ७० वर्ष राज्य केलं, त्यांची आता स्थिती पाहा. भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती असणं नैसर्गिक आहे. भाजपनेही लक्षात ठेवावं, आता भरती आहे, पण ओहोटी येणार, कारण हे नैसर्गिक आहे, कोणी थांबवू नाही शकणार, असं राज ठाकरे म्हणाले.