नाशिकः प्रहारचे आमदार बच्चू कडू काल न्यायालयीन कामासंदर्भात नाशिक येथे आले होते त्यानंतर त्यांनी नाशिक मधील ग्रामीण भागात दौरा केला. यावेळी बच्चू कडू हे निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याने दोन एकर कांदा पिकावर मागच्या काही दिवसांपूर्वी रोटर फिरवला होता. त्या शेतकऱ्याची आज आमदार बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली. “भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत या गद्दारांबरोबर जायला नको होतं”, असं म्हणत एका शेतकऱ्याने बच्चू कडू यांना थांबवलं. तसेच, भाऊ विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष कांदा उत्पादकांना न्याय द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

कांद्याला मिळत असलेला कमी भाव आणि झालेला खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संतापून कांदा उत्पादक शेतकरी अनिल बोरगुडे यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी आपल्या दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरविला होता. त्यानंतर या शेतकऱ्याच्या शेतीला आमदार रोहित पवार, आमदार दिलीपराव बनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या शेतकऱ्यांशी आणि कुटुंबाशी संवाद साधला होता.

यांना आई-वडील म्हणावं का? तीन महिन्यांच्या लेकीला संपवलं, गोधडीत गुंडाळून कचऱ्यात फेकलं, कारण…
बच्चू कडूंचा नाशिक दौरा

आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात नैताळे येथे रात्री भेट दिली. या भेटीत कांदा पिकावर रोटर फिरविलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आमदार बच्चू कडू यांनी सवांद साधताना विद्यमान सरकारची पाठराखनच केली. शेतकरी आपल्या पिकांना हमी भाव न मागता मजूरी म्हणून अनुदान मागु शकता, असे ते म्हणाले.

बच्चू कडूंनी वेळ मारुन नेली

भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात शेतकरी कष्टकरी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षाने बघतो. तुम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता. पण, तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं..! असं शेतकऱ्याने बच्चू कडू यांना म्हटलं. यावेळी त्या शेतकऱ्याला स्थानिक ग्रामपंचायातीचे उदाहारण देऊन आमदार बच्चू कडू यांनी वेळ मारुन नेली.

चिमुकल्याचं अपहरण, पाच दिवसांनी मृतदेह तलावात, कारण कळताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here