परभणी: तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे असे म्हणून सोबत घेऊन जाऊन दोन अल्पवयीन आरोपीने एका अल्पवयीन मुलीसोबत फोटो काढून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासोबतच तुझ्या मैत्रिणी सोबत आमची सेटिंग लावून दे असे देखील ते मुलीला म्हणाले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथे घडली आहे.

गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे जात होती. याचवेळी गावातील एक १७ वर्षीय मुलगा आणि एक अठरा वर्षीय मुलगा मुलीजवळ आला. तुला तुझ्या मैत्रिणीने बोलावले आहे तू आमच्या सोबत चल असे म्हणून मुलीला घेऊन गेले. मुलगी सोबत आल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपींनी तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे, असे म्हणन मुली सोबत बळजबरीने फोटो काढला. हा प्रकार घाबरलेल्या मुलीने घरी असलेल्या आपल्या आजीला सांगितला. त्यानंतर आजीने ऊस तोडी साठी गेलेल्या आपल्या मुलाला मुली सोबत गावातील दोन मुलांनी असा प्रकार केला असल्याची माहिती दिली.
मुंबईतील धूळ आणू आटोक्यात! हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी BMC लवकरच SOP बनवणार
मुलीच्या वडिलांना माहिती मिळतच त्यांनी ऊस तोडीच्या ठिकाणावरून गंगाखेड पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून दोन अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपींना बाल सुधार गृहामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथे एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.
पुलासाठी उद्या अंतिम ब्लॉक! गोखले पुलासाठी आज रात्रीपासून ८ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here