Chhatrapati Shivaji Maharaj | शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुतळ्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्यांना चांगलेच फटकारले. केवळ पुतळे उभारून फायदा नाही, शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.

 

Shivjayanti 2023
शिवजयंती २०२२

हायलाइट्स:

  • इंदू मिलमध्ये मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे
  • इतकं मोठं ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे की, अख्खं जग त्याठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी आलं पाहिजे
  • केवळ महापुरुषांचे पुतळे उभारून आपल्या हाती काहीही लागणार नाही
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचे केवळ पुतळे उभारून काहीही होणार नाही. त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांच्या विचारांबद्दल आपण आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तसं केलं नाही तर येणारा काळ महाराष्ट्रासाठी अवघड असेल, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते गुरुवारी मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केवळ पुतळ्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण करू पाहणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत फटकारले. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबत नेहमी बोलतो. इंदू मिलमध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे, इतकं मोठं ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे की, अख्खं जग त्याठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी आलं पाहिजे. नुसते पुतळे उभारून काय होणार आहे? नाक्यानाक्यावर, प्रत्येक चौकात शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून काय साध्य होणार आहे? अशाप्रकारे महापुरुषांचे पुतळे उभारून आपल्या हाती काहीही लागणार नाही. आपण फक्त जयंती आणि पुण्यतिथीला या पुतळ्यांना हार घालून मोकळे होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर काय बोलून गेले, त्यांचे विचार काय होते, याचं आत्मचिंतन केलं तर महाराष्ट्राचं काही खरं नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणावर राज ठाकरे आक्रमक, ज्याने हल्ला केला त्याला…
यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थितीवरही टिप्पणी केली. आता जे सगळं सुरु आहे, ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. मला राजकारणाची समज आल्यापासून मी असा महाराष्ट्र कधीही पाहिला नाही. इतकं गलिच्छ राजकारण, खालच्या दर्जाची भाषा मी आजपर्यंत कधीही पाहिली नाही. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडत आहेत. किती खालच्या थराला जाऊन बोलायचं, याला काही मर्यादा आहेत की नाही, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
५० खोके, नागालँड ओक्के, गुलाबरावांनी डिवचलं, अजितदादा संतापले, मुख्यमंत्र्यांनी मजा घेतली

आमच्या वाटेला गेले अन् मुख्यमंत्रीपद गेलं, राज यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. मनसेने मशिदींवरील भोग्यांच्या विरोधात आंदोलन केले तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर राज्यभरात १७ हजार केसेस टाकण्यात आल्या. पण आमच्याशी पंगा घेतला अन् शेवटी तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं ना, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी वर्धापनदिनी फार जास्त राजकीय फटकेबाजी करणे टाळले. काही दिवसांनी होऊ घातलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मी राजकीय गोष्टींवर सविस्तरपणे बोलणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. वर्धापदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी मनसेच्या गेल्या १७ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. या काळात मनसेने कोणती आंदोलने केली, कोणते मुद्दे धसास लावले, मनसेमुळे काय बदल घडले, याबद्दल माहिती दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here