Madha Fire : किराणा दुकानाला भीषण आग (Fire Broke) लागल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात केवड (Kewad) गावात घडली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ‘गंधर्व किराणा स्टोअर्स अँड ट्रेडिंग कंपनीला’ (Gandharva Kirana Stores and Trading Company) ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं आहे. या आगीत 33 लाख रुपयांच्या साहित्यासह दीड लाख रुपयांची रोकडही भस्मसात झाली आहे. याबाबतची माहिती दुकानाचे मालक गणेश महारुद्र चव्हाण (Ganesh Chavan) यांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या आगात चार मोठे फ्रिज, फॅन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रीक वजनकाटे, LED TV तसेच दुकानातील तांदूळ, शेगदाणा,सर्व प्रकारच्या दाळी, खाद्य तेल, साखर, बेसण, ड्रायफुड, विविध प्रकारचे मसाले, सौंदर्य प्रसाधने, शालेय स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच फर्निचरही जळाले आहे. एकूण 33 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दीड लाख रुपयांची रोक रक्कम देखील जळून खाक झाली आहे. मोठा आर्थिक फटका चव्हाण यांनी बसला आहे. 

येत्या आठवड्यात होणार होते मॉलचे उद्घाटन 

गेल्या काही दिवसांपासून गंधर्व ट्रेडिंग कंपनीच्या गंधर्व मॉलचे काम सुरु आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. येत्या आठवड्यात कालिदास चव्हाण यांच्या या मॉलचे उद्घाटन देखील होणार होते. मात्र, त्यापूर्वीच मॉलसह किराणा दुकान आगीत जळाल्याची घटना घडली.  

आग भीषण असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच चव्हाण कुटंबियांसह केवड येथील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भीषण असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं. त्यानंतर बार्शी येथून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर आग अटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळाले होते. याबाबत गणेश चव्हाण यांनी माढा पोलिसात माहिती दिली आहे. या आगीत आमचं मोठं नुकसान झालं आहे. दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे. हाती काहीच शिल्लक राहिले नसल्याची माहिती गणेश चव्हाण यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

Bhiwandi News : पेटता दिवा पडल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक, भिवंडीतील धक्कादायक घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here