मुंबई : गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारांमध्ये आलेल्या वादळी घसरणीचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स ७२४.५४ अंकांनी घसरून ५९,०८१.७४ वर खुला झाला, तर निफ्टी १९५ अंकांनी घसरून १७,३९४.३० अंकांवर उघडला. आज शेअर बाजाराची सुरुवात खूपच कमकुवत झाली. याआधी गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजाराच्या वाढीला ब्रेक लागला आणि सेन्सेक्स ५४२ अंकांनी तर निफ्टी १६० अंकांनी घसरला.

प्री-ओपनमध्ये बाजारावर दबाव
आज प्री-ओपन सत्रापासूनच बाजारावर दबाव दिसत आहे. व्यवहार सुरू होण्यापूर्वीच बाजार आज तोट्यात असल्याचे संकेत मिळत होते. सिंगापूरमधील एनएसई निफ्टी फ्युचर्स SGX निफ्टी सकाळी १४० अंक किंवा ०.७९ टक्क्यांनी घसरला, त्यानंतर आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात होईल असे संकेत मिळाले. बाजाराच्या प्री-ओपन सत्रात बीएसई सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, तर एनएसई निफ्टी सुमारे ०.९० टक्क्यांनी कोसळला.

गौतम अदानींवर पुन्हा लक्ष्मी प्रसन्न! एका झटक्यात कमावले १० हजार ८४३ कोटी
अदानी समूहाच्या शेअर्सवरही प्रचंड दबाव
गेल्या अनेक दिवसांपासून रिकव्हरी मोडमध्ये असलेल्या अदानी ग्रुपचे शेअर्सच्या वाढीवर आज ब्रेक लागला आणि पुन्हा एकदा त्यामध्ये घसरणीच्या व्यवहार होत आहे. अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन वगळता जवळपास सर्व समुहाचे समभाग सुरुवातीच्या व्यवहारात लाल रंगात व्यवहार करत होते. तर अदानी समूहाच्या समभागांमध्ये अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर, एसीसी, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्ही यांचा समावेश आहे.

छप्परफाड कमाई! टाटा समूहाचा रॉकेटसिंग शेअर, गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस पाडला!
बाजाराची स्थिती
सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीच्या सत्रात दोन कंपन्या वगळता सर्व शेअर्सना तोटा सहन करावा लागला. सुरुवातीच्या व्यवहार सत्रात फक्त टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल यांनी नफा नोंदवला. तर इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स यांसारखे समभाग २ टक्क्यांपर्यंत घसरले.

शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेअर बायबॅकचा नियम बदलला, जाणून घ्या
जागतिक शेअर बाजाराची स्थिती
गुरुवार यूएस शेअर बाजारात घसरणीसह बंद झाला, ज्याचा परिणाम आज भारतासह आशियाई शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. गुरुवारी वॉल स्ट्रीटचा मुख्य संवेदनशील निर्देशांक डाऊन जोन्स ५४३ अंकांनी घसरला आणि ३२,२५४ अंकांच्या पातळीवर क्लोज झाला. त्याच वेळी, एस अँड पी ५०० मध्ये १.८५ टक्के घट नोंदवली गेली असून नॅसडॅक २.०५ टक्के किंवा २३७ अंक घसरून ११,३३८ वर क्लोज झाला. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान आशियाई बाजारात देखील चांगली घसरण पाहायला मिळाली. तर लंडनसह युरोपातील इतर मार्केटमध्येच्या फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये पडझड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here