मुंबई: होळी खेळून घरी परतलेल्या पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली. पूर्व नगरातील घाटकोपरमध्ये ही घटना घडली. दिपक शाह आणि टिना शाह अशी मृतांची नावं आहेत. शाह दाम्पत्य घाटकोपर पूर्वेतील कुकरेजा टॉवर्समध्ये वास्तव्यास होतं.

शाह दाम्पत्याकडे काम करणारी महिला सकाळी घराबाहेर पोहोचली. तिनं बराच वेळ घराची बेल वाजवली. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलेनं दीपकच्या आईंना फोन केला. त्यांनी याची माहिती जवळच राहत असलेल्या एका नातेवाईकाला दिली. नातेवाईकनंही अनेकदा फोन केले. मात्र दिपक आणि टिना यांनी कॉल्सना प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना बोलावलं.
तुमची बायको आता या जगात नाही! पोलिसांचा फोन, पती कोलमडला; अपघातात शिक्षिकेच्या देहाची चाळण
पोलिसांनी डुप्लिकेट चाव्यांच्या मदतीनं दरवाजा उघडला. त्यावेळी दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये आढळून आले. दोघांच्या शरीरावर जखमांच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी घातपाताची शक्यता फेटाळली. दाम्पत्यानं मंगळवारी शेजाऱ्यांसोबत होळी साजरी केली. त्यानंतर दोघे घरी गेले. पुढच्या काही तासांत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे दोघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. वायू गळतीमुळे जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये बुधवारी घडली. दिपक आणि शिल्पी अशी दोघांची नावं आहेत. ते दोघे मुरादनगर्या अग्रसेन विहारमध्ये वास्तव्यास होते.
एअर इंडियाच्या केबिन क्रूला अधिकाऱ्यांनी रोखलं; शर्टच्या बाह्या वर करायला लावल्या अन् मग…
होळी खेळून घरी आलेले दिपक आणि शिल्पी अंघोळीला गेले. त्यांनी गिझर सुरू केला. मात्र त्यातून सुरू असलेली गळती त्यांच्या लक्षात आली नाही. तास उलटूनही दोघे बाहेर न आल्यानं त्यांच्या मुलांना चिंता वाटली. त्यांनी बाथरुममध्ये पाहिल असता दोघे बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना गाझियाबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here